जाफराबाद: शेतकऱ्यांना तटपुंजी मदत दिली तर सर्वांनी एकत्र येत सरकार पुढे आव्हान उभा करू, सिपोरा येथे अ.भा.छावाचे अध्यक्ष विजय घाडगे
आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2026 वार शुक्रवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद या मतदारसंघात अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आहे,याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की सरकार कोरड्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना तटपुंजी मदत देण्याच्या तयारीत आहे,मात्र जर तटकुंची मदत मिळाली तर आपण सर्व शेतकरी एकत्र येत सरकार पुढे मोठं आवाहन उभं करू व सरकारला ठिकाणावर आणू असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.