सावनेर: सावनेर येथील मा मीनाक्षी थेटर येथे आयोजित भरोसा चित्रपटाच्या सादरीकरण कार्यक्रमास आमदार यांची भेट
Savner, Nagpur | Oct 1, 2026 सावनेर येथील मॉ मिनाक्षी थिएटर येथे आयोजित ‘भरोसा’ चित्रपटाच्या सादरीकरण कार्यक्रमास आज भेट दिली. यावेळी चित्रपटाचे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, टीम तसेच चिमुकल्या प्रेक्षकांशी संवाद साधला. चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील विविध विषय प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देणाऱ्या अशा कलाकृतींना सकारात्मक प्रतिसाद मिळणे निश्चितच आनंदाची बाब आहे. ‘भरोसा’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!