रामटेक: पिपरिया पेठ (रामटेक) परिसरात बिबटच्या हल्ल्यात एक बकरी ठार तर एक जखमी
Ramtek, Nagpur | Aug 19, 2026 रामटेक शहराच्या उत्तर सीमेवर शांतिनाथ जैन मंदिर जवळ असलेल्या पिपरिया पेठ, इंदिरानगर परिसरातील रोशन बाळकृष्ण दुर्वे यांच्या घरी बांधलेल्या पाच पैकी एका बकरीवर बुधवार दिनांक 21 ऑगस्टला रात्री अडीच वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबटने हल्ला करून तिचा नरडीचा घोट घेतला व पोट फाडून तिला ठार केले. तर एक बकरी जखमी झाल्याचे धुर्वे परिवाराने सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांनी यास दुजोरा दिला आहे.