PMC Breaking News : पुणे महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला ठेकेदाराकडून जीवे मारण्याची धमकी?; महापालिकेत खळबळ...
पुणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. येरवडा परिसरात १५ फूट खोल खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित प्रकरणात जबाबदार धरून पुणे महापालिकेने ठेकेदार शुभम खातोडे याला ब्लॅकलिस्ट केले होते. आता याच ठेकेदाराने महापालिकेचे कार्यकारी अभियंता सदानंद लिटके यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
सदानंद लिटके यांनी धमकीमुळे मानसिक तणाव आणि प्रकृती बिघडल्याचे नमूद करत दोन ते तीन दिवसांच्या रजेबाबत संबंधित विभागाला पत्र दिल्याची माहिती आहे. या पत्रामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. ठेकेदाराने धमकी का दिली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सकारात्मक अभिप्राय देण्यावरून वाद झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी त्याला अधिकृत
Pune City, Pune | Nov 18, 2026