लखनऊमध्ये तरुणाला जबरदस्ती कारमध्ये बसवून नेले! पोलीस वर्दीतील व्यक्तीही दिसल्याचा दावा
उत्तर प्रदेशातील लखनऊच्या कॅम्पबेल रोड परिसरात एका तरुणाला काही व्यक्तींनी जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, या व्यक्तींमध्ये पोलीस गणवेशातील एक व्यक्तीही होती.
मात्र, तरुणाला नेणारे नेमके कोण होते? ही अपहरणाची घटना आहे की पोलिसांची अधिकृत कारवाई? याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
लखनऊ पोलिसांनी या घटनेची स्पष्ट माहिती देऊन नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे, अशी मागणी होत आहे.
#LucknowNews #UttarPradesh #BreakingNews #PoliceAction #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Nov 18, 2026