लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत ५ दुकाने फोडली; १६ हजार २०० रुपयांची रोकड लंपास
लोणावळ्यात चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच दुकानांना लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साधना कॉम्प्लेक्स परिसरात दोन अज्ञात चोरट्यांनी दुकाने फोडून एकूण १६ हजार २०० रुपयांची रोकड चोरून नेली. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली. चोरट्यांनी रायबा मेन्स वेअर, प्रिंट वन साईज अँड डिजिटल बोर्ड, कुर्ती हाऊस, ब्लू लेडी आणि कॉपर वूड मेन्स वेअर या पाच दुकानांना लक्ष्य केले.
आरोपींनी दुकानांचे शटर अर्धवट उघडून आत प्रवेश केला आणि काउंटरमध्ये ठेवलेली रोकड चोरून नेली.
या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी दोन अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिस
Pune City, Pune | Nov 18, 2026