दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्या SPO जवानांचे मृतदेह डंपरमधून आणले! व्हिडिओ व्हायरल
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या दोन SPO जवानांच्या मृतदेहांची वाहतूक डंपरमधून करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रशपाल सिंह आणि बॉबी चंद अशी मृत जवानांची नावे आहेत. गुरुवारी किश्तवाडमधील देहरना जंगलात दोघांचे मृतदेह आढळले होते. त्यांच्या शरीरावर गोळ्यांच्या अनेक जखमा होत्या, तसेच त्यांची सर्व्हिस रायफलही गायब होती.
या प्रकारावर भाजप आमदार शगुन परिहार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला. शुक्रवारी डच्छन येथील केयार या त्यांच्या मूळ गावी दोन्ही जवानांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद जवानांना सन्मानपूर्वक निरोप देण्याच्या व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
#JammuKashmir #Kishtwar #IndianSecurityForces #SPO #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Nov 18, 2026