दहावी बोर्ड परीक्षेला आज (दि. २० फेब्रुवारी) सुरुवात झाली असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी मंडळाने कडक उपाययोजना केल्या आहेत.प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ज्या ठिकाणी कॅमेरे कमी आहेत, तेथे केंद्रप्रमुख व संचालक विशेष लक्ष ठेवत आहेत.बारावीप्रमाणे दहावीकरिता स्वतंत्र भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून हे पथक अचानक भेट देऊन तपासणी करणार आहे.