महाशिवरात्री निमित्त खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे भाविकांची रात्रीपासूनच मोठी रांग लागली होती. मंदिर संस्थान समितीने सुमारे दोन लाख भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला होता. शनिवारी दिवसभरात सुमारे ६० हजार भाविकांनी दर्शन घेतले होते. रात्री बारा वाजता महाअभिषेक व महाआरतीने उत्सवाची सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. भाविकांना सुमारे तीन तासांत दर्शन घडावे यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.