येत्या रविवार दि.१५ रोजी महाशिवरात्रीमुळे वेरुळ येथे श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था वेरुळ गावापासून काही अंतरावर केली असून ग्वातील भगवान महावीर ते मालोजीराजे भोसले चौक या दरम्यानचा दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर वाहनांना अत्यावश्यक सेवा वगळता प्रतिबंध करण्यात आला आहे,असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत.