रामटेक: गो - अनुसंधान केंद्र, देवलापार येथे सरसंघचालक यांचे हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ
Ramtek, Nagpur | Oct 7, 2026 विश्व हिंदू परिषद चे प्रमुख अशोक सिंगल यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्य साधत देवलापार येथील गो अनुसंधान केंद्र परिसरातील निर्मित विविध विकास कामे व उपक्रमांचा शुभारंभ सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. बुधवार दिनांक 7 ऑक्टोबरला आयोजित या कार्यक्रमात राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल सहित विहीपचे पदाधिकारी उपस्थित होते.