रामटेक: वर्षाबेन प्रफुल पटेल यांच्या हस्ते उघडले धार्मिक पर्यटन स्थळ रामधाम मनसर येथील बाबा बर्फानी चे कपाट
Ramtek, Nagpur | Aug 18, 2026 धार्मिक पर्यटन स्थळ असलेल्या प्रसिद्ध रामधाम तीर्थक्षेत्र मनसर येथे श्रावण महिन्याच्या निमित्त बाबा बर्फानी मंदिराचे कपाट भाविकांसाठी खुले करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल यांच्या पत्नी सौ वर्षाबेन पटेल यांच्या हस्ते शिवलिंगाची विधिवत पूजा करून मोठ्या भक्ती भावात कपाट उघडण्यात आले. हे कपाट आगामी महाशिवरात्री पर्यंत उघडे राहणार असल्याची माहिती रामधाम चे संस्थापक तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी दिली.