रामटेक: ग्रा.पं. उमरी - चिचदा ची विवादित ग्रामसभा 20 ऑगस्टला बीडीओ जयसिंग जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न
Ramtek, Nagpur | Aug 20, 2026 गट ग्रामपंचायत उमरी चिचदाची विवादित ग्रामसभा 20 ऑगस्टला बीडिओ जयसिंग जाधव, विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत नवेगाव चिचदा येथे घेण्यात आली. सरपंच रवींद्र कुंभरे यांचे गैरहजरीत उपसरपंचाच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली. या सभेत मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते. मात्र याही सभेत बीडिओ निघून गेल्यावर विषय सूचीतील विषयांना बगल देऊन ग्रामसभा गुंडाळण्यात आल्याची माहिती ग्रामवासीयांनी दिली.