नरखेड: काटोल-नरखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार!
Narkhed, Nagpur | Sep 15, 2026 इसासनी येथील SRPF परिसराला तारेचे कुंपण केल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे.पावसाळ्यात मशागत, खत-बियाणे आणि शेतमाल वाहतुकी करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.: आमदार चरणसिंगजी ठाकूर यांनी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन निवेदन दिले: शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी स्वतंत्र व योग्य रस्ता लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.