रामटेक: रस्त्यांवर ठिय्या मांडून बसलेल्या मोकाट पशुंचा बंदोबस्त करण्याची रामटेकवासीयांची मागणी
Ramtek, Nagpur | Aug 24, 2026 शहराच्या रामटेक मनसर मार्गावरील बस स्टँड चौक, शांती मंगल कार्यालयाच्या समोर,गवळण नाला परिसर,शीतलवाडी टी पॉईंट, रेल्वे स्टेशन समोरील मार्गावर तसेच रामटेक बायपास मार्गावरील बस स्टँड चौक ते मुरमुरा भट्टीपर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी मोकाट पशुंचा ठिय्या बघावयास मिळतो.24 ऑगस्टला पाहणी दरम्यान या मार्गावर मोकाट पशु ठिय्या मांडून बसल्याचे दिसून आले.या मोकाट पशुंचा बंदोबस्त करण्याची मागणी रामटेकवासीयांनी केली आहे