रामटेक: उमरी गट ग्रा. पं. ग्राम सभेतून सचिव, सरपंच यांनी पळ काढल्याने संतप्त ग्रामवासी पोहचले पं. स. रामटेक कार्यालयात.
Ramtek, Nagpur | Aug 19, 2026 उमरी गट ग्रा. पं. येथे 15 ऑगस्टला ग्रामसभा न झाल्याने ती 19 ऑगस्ट ला आयोजित करून चर्चा न होताच तहकूब करण्यात आल्याने उपस्थित 100 च्या वर ग्रामस्थ संतापले व त्यांनी तब्बल सहा किलोमीटर अंतर कापून पं. स. रामटेक कार्यालय गाठून बिडिओ जायसी जयसिंग जाधव यांचे कडे संतप्त भावना व्यक्त करीत ग्रामसभा विकास अधिकारी कृष्णा बानाबाकोडे यांची तक्रार केली. ही तहकूब सभा 20 ऑगस्टला घेण्यात यावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावू असा इशारा देण्यात आल्यानंतर 20 ऑगस्टला सभा घेण्याचे ठरले.