रामटेक: कांद्री ( मनसर) चेक पोस्ट वरील कथीत अवैध वसुली आणि तंबाखू तसेच अमली पदार्थाची तस्करी रोखण्याची मागणी
Ramtek, Nagpur | Oct 6, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या मनसर-कांद्री चेक पोस्टवर सुरू असलेल्या कथित अवैध वसुली तसेच तंबाखू आणि अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम मस्के यांनी चेक पोस्ट प्रमुखांना निवेदन दिले आहे. यावेळी अवैध वसुली तसेच अमली पदार्थांची तस्करी तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली.