रामटेक: रामटेक पोलिसांनी लावला अल्पवयीन बेपत्ता मुलीचा शोध
Ramtek, Nagpur | Oct 7, 2026 पोलीस स्टेशन रामटेक येथे मागील ३० सप्टेंबरला दाखल एका गुन्ह्यातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन बेपत्ता मुलीचा शोध लावण्यात रामटेक पोलिसांना यश आले आहे. तिला गिट्टी खदान नागपूर येथून ताब्यात घेण्यात येऊन बुधवार दिनांक ७ ऑक्टोबरला वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर मेडिकल हॉस्पिटल ला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.