कल्याण पूर्वेतील साईराज कॉलनी, एफ केबिन परिसरात धक्कादायक घटना ,दुचाकीतून पेट्रोल गळती अन् फटाक्याच्या ठिणगीने तरुणाच्या अंगाचा भडका! आगीच्या लपटांसह भररस्त्यात धावला; नागरिकांनी कपडे काढून वाचवले प्राण, नातेवाईक महिलेलाही आगीची झळ; थरार CCTV मध्ये कैद!**
दुचाकीतून पेट्रोल गळती होत असल्याने सचिन सिंह हा तरुण पेट्रोलची गळती रोखण्याचा प्रयत्न करत असताना
त्याचवेळी फटाक्याची ठिणगी त्याच्या कपड्यांवर पडली आणि क्षणार्धात कपड्याने पेट घेतला.
अंगावर आगीच्या लपटांनी वेढा घातल्याने जीव वाचवण्यासाठी सचिन भररस्त्यात धावू लागला.
यावेळी नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याचे कपडे काढून आग विझवली आणि त्याचे प्राण वाचवले.
विशेष म्हणजे, सचिनला वाचवण्यासाठी घटनास्थळी आलेल्या त्याच्या नातेवाईक महिलेलाही आगीची झळ बसल्याचे CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
या घटनेत सचिन सिंह हा १८ टक्के भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू �
Kalyan, Thane | Nov 10, 2026