गांधारी गावात दिवाळी पाडव्याचा पारंपरिक उत्साह; गुरांना अग्नीतून नेण्याची अनोखी प्रथा आजही कायम!
शर्यतीतील नामांकित बैलजोड्यांची विशेष उपस्थिती; पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह बैलप्रेमींची मोठी गर्दी
कल्याण पश्चिमेतील गांधारी गावात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून चालत आलेली गुरांना अग्नीतून नेण्याची अनोखी परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आधुनिकतेच्या युगातही आपल्या पूर्वजांनी जपलेल्या रूढी-परंपरांचा वारसा कायम ठेवत ग्रामस्थांनी दिवाळी पाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. यावेळी शर्यतीतील नामांकित बैलजोड्यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी गावात पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर अग्नी प्रज्वलित करून गुरांना त्यातून नेण्याची जुनी प्रथा पार पाडण्यात आली. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेल्या या परंपरेला गावात विशेष महत्�
Kalyan, Thane | Nov 10, 2026