Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
अयोध्या
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Uttarpradesh
Haryana
Lucknow
तेजस्वी_यादव
Sambalpur
लखनऊ
Crimenews
महंगाई
Aap
jilhavarta
कल्याण स्टेशन परिसरातील लक्ष्मी मार्केटमध्ये शेडमध्ये भीषण आग , स्टेशन परिसरात आग लागल्याने एकच खळबळ,अग्निशमन घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्न सुरू
Kalyan, Thane
| Nov 9, 2026
MORE NEWS
गांधारी गावात दिवाळी पाडव्याचा पारंपरिक उत्साह; गुरांना अग्नीतून नेण्याची अनोखी प्रथा आजही कायम! शर्यतीतील नामांकित बैलजोड्यांची विशेष उपस्थिती; पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह बैलप्रेमींची मोठी गर्दी कल्याण पश्चिमेतील गांधारी गावात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून चालत आलेली गुरांना अग्नीतून नेण्याची अनोखी परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आधुनिकतेच्या युगातही आपल्या पूर्वजांनी जपलेल्या रूढी-परंपरांचा वारसा कायम ठेवत ग्रामस्थांनी दिवाळी पाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. यावेळी शर्यतीतील नामांकित बैलजोड्यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. दिवाळी पाडव्याच्या दिवशी गावात पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर अग्नी प्रज्वलित करून गुरांना त्यातून नेण्याची जुनी प्रथा पार पाडण्यात आली. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेल्या या परंपरेला गावात विशेष महत्�
Kalyan, Thane | Nov 10, 2026
कल्याण मध्ये शेतकऱ्यांकडून बलीप्रतिपदा साजरी कल्याण पूर्व माणेरे गावात बैलांना सजवून बैलांची काढली मिरवणूक , पारंपरिक ढोरा उडवणे ही प्रथा बलिप्रतिपदा मोठया उत्साहात साजरी कल्याण : ठाणे रायगड जिल्ह्यात दिवाळीत येणारा बलीप्रतिपदा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.. .ठाणे रायगड जिल्ह्यातील शेतकरी बलीप्रतिपदेच्या दिवशी गायी, बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात...कल्याण मध्ये देखील शेतकरी वर्गाने बलीप्रतीपदा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कल्याण मधील माणेरे गावातील ग्रामस्थांनी सहकुटुंब आज बैलांना रंगवून ,बैलांची पूजा केली ...बैलांना पुरण पोळीचा गोड नैवैद्य भरवण्यात आला ...त्यानंतर बैलांची गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली ..... वर्षभर बळीराजाला साथ देणाऱ्या बैला प्रती कृतज्ञता व्यक्त केली ...गावाच्या वेशीवर गवताच्या पेंढ्या जाळत त्यावरून बैल उडवून हा सण साजरा केला ....भात काढणीनंतर भात शेतात ठेवला जातो ,काही व
Kalyan, Thane | Nov 10, 2026
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कल्याणात ‘दिवाळी पहाट’; आर्थिक मदतीला उत्स्फूर्त प्रतिसाद! भाजप कल्याण पश्चिम, मंगेशी ग्रुप आणि कल्याण गौरवचा स्तुत्य उपक्रम; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांचा मदतीचा हात दिवाळीचा आनंद साजरा करतानाच संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्याचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श कल्याणमध्ये पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्ष कल्याण पश्चिम, मंगेशी ग्रुप आणि कल्याण गौरव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत आर्थिक योगदान देण्यात आले. कल्याण पश्चिमेतील आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके मैदान येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच संगीतप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाचा आनंद घेतला. मात्र, यंदाच्या दिवाळी पहाटचे विशेष आकर्षण केवळ संगीताची मैफल नव्हती, तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्र आलेल्या सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांचा सहभाग हे ठरले. कार्यक्रमादरम्यान कल्याणमधील विविध सामाजिक संस्था, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. विशेष म्हणजे, या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना पुढील दोन दिवसही आयोजकांकडे धनादेशाद्वारे आर्थिक योगदान देता येणार आहे. नामवंत गायकांच्या सुरेल मैफलीने रसिक मंत्रमुग्ध या दिवाळी पहाट कार्यक्रमात मराठी भक्तिगीते, संत तुकारामांचे अभंग, भावगीते तसेच पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांमधील लोकप्रिय गीतांची सुरेल मैफल रंगली. सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम, हर्षवर्धन वावरे, पार्श्वगायिका आनंदी जोशी आणि भाग्यश्री देशपांडे यांनी आपल्या सुमधुर गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. भक्तिसंगीत आणि मराठी भावगीतांच्या सुरांनी फडके मैदानावरील वातावरण भक्तिमय झाले होते. सुप्रसिद्ध निवेदिका दीप्ती भागवत यांच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.
Kalyan, Thane | Nov 10, 2026
कल्याणच्या मुख्य मार्केटमध्ये महिलांचा राडा! तरुणीच्या कानशिलात लगावली; २० मिनिटे गोंधळ, VIDEO व्हायरल!दोन तरुणी आणि कुटुंबात मार्केटमध्ये जोरदार वाद.
Kalyan, Thane | Nov 10, 2026
शिवप्रेरणा मित्र मंडळाचा अनोखा दीपोत्सव; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य! भिवंडीतील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मिठाई, आवश्यक वस्तू व भेटवस्तूंचे वाटप; सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी साजरी दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. मात्र, हा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश पसरवण्याचे स्तुत्य कार्य कल्याण पश्चिमेतील दुर्गानगर, ठाणकरपाडा येथील शिवप्रेरणा मित्र मंडळाने केले आहे. मंडळाच्या वतीने 'दीपोत्सव २०२६' या उपक्रमांतर्गत भिवंडी तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मिठाई, आवश्यक वस्तू आणि भेटवस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी साजरी करण्यात आली. शिवप्रेरणा मित्र मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. दिवाळीच्या निमित्ताने ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत सणाचा आनंद वाटण्याची परंपरा मंडळाने जपली आहे. मंडळाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलले. शिक्षक शरद ठाणगे यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात मंडळाचे खजिनदार शरद ठाणगे यांचा मोलाचा वाटा आहे. ठाणगे हे भिवंडी तालुक्यातील लाप गाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या गरजा आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक परिस्थितीची जाणीव असल्याने त्यांच्या पुढाकारातून मंडळाच्या सहकार्याने दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. विशेष म्हणजे, शिवप्रेरणा मित्र मंडळ दरवर्षी माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करते. मात्र, धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांपुरतेच मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजातील गरजू घटकांसाठी योगदान देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग या सामाजिक उपक्रमात स्वप्नील मोरे, प्रदीप हुले, प्रीतम मोरे, भूपेंद्र मोरे, आशिष साठे, अनंता पगार, ओंकार धात्रक, दत्ता भडवीळकर, शशांक हळदणकर, अवधूत चरतकर, शरद ठाणगे, विपुल मोरे, चिराग महाडिक, रितेश पाबळे, मयूर राठोड, सचिन जाधव, शेखर कांबळे, कुशल चव्हाण, ओम उबाळे, जीत शेट्टी, सिद्दू सणस, किर्ष सदगीर, लालू बोनदारडे, वैभव तेली, सौरभ महाडिक, सचिन आहेर, अमित मोरे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
Kalyan, Thane | Nov 10, 2026
कल्याण पूर्वेतील साईराज कॉलनी, एफ केबिन परिसरात धक्कादायक घटना ,दुचाकीतून पेट्रोल गळती अन् फटाक्याच्या ठिणगीने तरुणाच्या अंगाचा भडका! आगीच्या लपटांसह भररस्त्यात धावला; नागरिकांनी कपडे काढून वाचवले प्राण, नातेवाईक महिलेलाही आगीची झळ; थरार CCTV मध्ये कैद!** दुचाकीतून पेट्रोल गळती होत असल्याने सचिन सिंह हा तरुण पेट्रोलची गळती रोखण्याचा प्रयत्न करत असताना त्याचवेळी फटाक्याची ठिणगी त्याच्या कपड्यांवर पडली आणि क्षणार्धात कपड्याने पेट घेतला. अंगावर आगीच्या लपटांनी वेढा घातल्याने जीव वाचवण्यासाठी सचिन भररस्त्यात धावू लागला. यावेळी नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याचे कपडे काढून आग विझवली आणि त्याचे प्राण वाचवले. विशेष म्हणजे, सचिनला वाचवण्यासाठी घटनास्थळी आलेल्या त्याच्या नातेवाईक महिलेलाही आगीची झळ बसल्याचे CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. या घटनेत सचिन सिंह हा १८ टक्के भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू �
Kalyan, Thane | Nov 10, 2026
डोंबिवली पूर्वेत खंबलपाडा परिसरातील शिवाजी शेलार मैदानात फटाक्यांमुळे आग अग्निशमन दल घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
Kalyan, Thane | Nov 9, 2026
कल्याण पत्री पूल परिसरात भरधाव कार मध्ये तरुणांचा जीवघेणा स्टंट ,video viral
Kalyan, Thane | Nov 9, 2026