भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत प्रशासकीय बैठकीचे आयोजन
दिनांक सात सप्टेंबर रोजी हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आगामी गणेशोत्सव तसेच विविध धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अभाजित राखण्यासाठी पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन भिवापूर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली