भिवापूर: नाड, शिवणफळ, तांडा गावासाठी बससेवा सुरू; सामाजिक कार्यकर्ते चेतन पडोळे यांच्या प्रयत्नांना यश
नाड, शिवनफळ आणि तांडा गावातील नागरिकांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. चारगाव (मु. मांडवा ,इंदापूर, तांडा,शिवनफळ, नाड,बेसूर बस स्टॉप या मार्गावर आज १ जुलै मंगळवारला दुपारी साडेबारा वाजता परिवहन महामंडळातर्फे नियमीत बससेवा सुरू करण्यात आली आहे ही सेवा सुरू करण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते चेतन पडोळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.