भिवापूर: तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सेवक यांनी नवेगाव देशमुख येथील प्रगतीशिल शेतकरी बहादुरे यांच्या शेतास दिली भेट
नवेगाव देशमुख येथील सेवानिवृत्त प्रगतशील शेतकरी सम्राट बहादुरे यांनी आपल्या १५ एकर शेतात रासायनिक खताचा वापर न करता नैसर्गिकरीत्या खजुर, संत्रा व मोसंबी या फळबागेची लागवड केली आहे. मागील तीन वर्षापूर्वी त्यांनी खजुराचे २०० झाडे लावली होती. त्यातील २५ झाडांना खजूराचे पिक सुद्धा आले आहे आज २३ जून सोमवारला कृषी सेवक यांनी सकाळी अकरा वाजता शेतात भेट दिली