नरखेड: हद्दपारीचे आदेश झुगारून जिल्ह्यात परतलेल्या महिला आरोपीवर गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Sep 14, 2026 उपविभागीय दंडाधिकारी, काटोल विभाग यांनी नागपूर जिल्ह्यातून एका महिन्यासाठी हद्दपार केलेल्या महिला आरोपी राहणार खेडी १५ आगस्ट पासून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपार आदेशाची पूर्ण माहिती असतानाही सदर महिला कोणतीही पूर्वपरवानगी न घेता नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील आपल्या घरी परत आल्याचे आढळली.विनापरवानगी जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध 'महाराष्ट्र पोलीस अधिनियमनातील कलम १४२' अन्वेये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.