रामटेक: जनसेवा वर्षानिमित्त रामटेक तालुक्यातील शेतमजुरांना घोंगड्यांचे वितरण
Ramtek, Nagpur | Sep 3, 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे माजी मुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ रामटेक तालुक्यात जनसेवा वर्ष राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रामटेक तालुक्यातील 5000 गरीब महिला शेतमजूर व शेतकऱ्यांना मोफत घोंगड्यांचे वाटप करण्यात आले. राकाचे प्रदेश उपाध्यक्ष पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.