भिवापूर: भिवापूर खरेदी विक्री सहकारी संस्थेत रासायनिक खताचा 33 लाखाचा गैरव्यवहार
भिवापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मध्ये रासायनिक खताच्या 3523 बॅक च्या साठ्यामध्ये गैरव्यवहार झाल्याने संस्थेचे 33 लाख 51 हजार 50 रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती याबाबत भिवापूर पोलिसांनी विविध कलमान्वये कारवाई करीत तीन जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक सुरेश नागोसे आणि तत्कालीन सभापती अरोरा यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला