कळमेश्वर: सावनेर रोडवरील अपघातातील जखमी संतोष ढोलस यांचा अखेर मृत्यू, रस्ते सुरक्षेचा अभाव याला जबाबदार कोण?
कळमेश्वर–ब्राह्मणी परिसरातील सावनेर रोडवरील आरामशीनजवळ 12 ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातातील जखमी संतोष परसलाल ढोलस यांनी अखेर जीवनाची झुंज गमावली. नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असताना 16 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.