रामटेक: रामटेक तालुक्यातील 25 ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण घोषित
Ramtek, Nagpur | Sep 8, 2026 मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला तहसील कार्यालय रामटेक येथील सभागृहात रामटेक तालुक्यातील 25 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्यात आले. रामटेक तहसील कार्यालयात तहसीलदार रमेश कोळपे यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. यामध्ये सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी 12 ग्रामपंचायती व सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता 13 ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आल्या.