कळमेश्वर: गोंडखैरी येथे रेशन धान्याची खरेदी ,दोघांवर गुन्हे दाखल
पोलीस व पुरवठा विभागाच्या पथकाने गोंडखैरी येथे केलेल्या कारवाईमध्ये नागरिकांकडून रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत त्याच्यावर फौजदारी गुन्हे नोंदविले दोघेही वाहन चालक असून ते घरोघरी जाऊन नागरिकांकडून रेशनचे धान्य खरेदी करत होते त्यांच्याकडून एकूण सात लाख 43 हजार 722 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या दोन वाहने व 10.48 क्विंटल धान्याचा समावेश आहे शेख शोएब अकबर शेख आणि मुजेब जावेद अख्तर शेख अशी आरोपी वाहन चालकाची नावे आहे