कुडाळ: सिंधुदुर्गमध्ये अतिरिक्त गवताचा उपयोग करून दुष्काळी भागातील पशुधनासाठी चारा उपलब्ध
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त गवताचा वापर करून दुष्काळी भागातील पशुधनासाठी चारा सुरक्षित पद्धतीने तयार करण्याचा आणि वितरण करण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कसाल येथे महिला बचत गटाच्या गवत कापणी प्रात्यक्षिकाचे निरीक्षण केले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन राबवले जात आहे.