सावनेर: रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते श्रेष्ठ, निराधार आजीला मिळाला माणुसकीचा आधार
Savner, Nagpur | Oct 24, 2026 खापरखेडा परिसरात निराधार असलेल्या वृद्ध 80 वर्षीय आजी सावित्रीबाई टेकाम यांचे खापरखेडा येथील डॉक्टर ओंकार केवदे यांच्या रुग्णालयात 24 ऑक्टोबर शनिवारला मृत्यू झाला मात्र अंत्यसंस्कार करण्याकरिता कोणीही वाली नव्हता याबाबत नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ सलग्न खापरखेडा पत्रकार संघाला माहिती मिळाली खापरखेडा पत्रकार संघाचे सचिव अभय मिश्रा व सहसचिव मयूर तिरपुडे यांना माहिती मिळाली सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून मनो रुग्णाचा रॉबिन हूड हितेश बनसोडे यांना माहिती देण्यात आली