कळमेश्वर: कळमेश्वर एम आय डी सी रेल्वे गेट जवळ मृत गोमातेवर अंत्यसंस्कार
कळमेश्वर एमआयडीसी रेल्वे गेटजवळ एक गोमाता मृत अवस्थेत पडल्याची माहिती मिळताच गौरक्षक मंगेश भाऊ गमे, प्रियांशू धोंगडी, तुषार पडोळे, निलेश रोडे, प्रतीक बागडे आणि सुजल भोगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.मृत गोमातेची योग्य पद्धतीने अंत्यविधी करण्यासाठी तुषार भाऊ पडोळे यांच्या जेसीबीच्या साहाय्याने व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर मंगेश भाऊ गमे व प्रियांश धोंगडी यांच्या हस्ते गोमातेचा अंत्यविधी करण्यात आला.