रामटेक: रामटेक शहरात जागोजागी तान्हा पोळा उत्साहात साजरा ; श्रीनिका ला आर्थिक मदत करीत माणुसकीचा पोळा केला साजरा
Ramtek, Nagpur | Sep 11, 2026 रामटेक शहरातील वार्डावार्डात तान्हा पोळा अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता पासून रामटेक शहरात जवळपास 100 ठिकाणी हा तान्हा पोळा भरविण्यात आला. सर्वच पोळा आयोजकांनी बालगोपाल बैल जोडी धारकांसाठी मिठाई,बक्षीसे,भेटवस्तू, भोजारा आदींची लय लूट केली होती. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.