कळमेश्वर: 14 मैल कळमेश्वर येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन
कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 14 मैल ते अमरावती रोडवरील 14 मैल टी-पॉइंटपासून सुमारे 100 ते 200 मीटर अंतरावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी व आवश्यक कार्यवाहीसाठी मंगेश भाऊ गमे यांच्या ॲम्बुलन्सद्वारे ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे आणण्यात आला.सदर मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.