कळमेश्वर: नागपूर-काटोल रोडवर भीषण अपघात; अल्टो कार पलटी होऊन आगीच्या भक्ष्यस्थानी
7 ऑक्टोंबर नागपूर-काटोल रोडवरील फेटरी हनुमान मंदिराजवळ भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात अल्टो कार पलटी होऊन गाडीला भीषण आग लागली. अपघाताच्या वेळी कारमध्ये प्रवासी असल्याची माहिती असून, काही प्रवासी जखमी झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच जखमींच्या मदतीसाठी मंगेश गमे देव्यांशी फाउंडेशनची ॲम्बुलन्स तातडीने रवाना करण्यात आली आहे.