कळमेश्वर: कळमेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत सावळी येथे आढळून आला इसमाचा मृतदेह
कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळी (बु.) येथे एका ४७ वर्षीय व्यक्तीचा राहत्या घरी फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शैलेश वाल्मीक मते (वय ४७, रा. सावळी (बु.)) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.