हिंगणा: एमआयडीसी पोलिसांची कारवाई: नागपूर आणि ग्रामीण भागातून तडकाफडकी हद्दपार केलेला गुन्हेगार गजाआड
Hingna, Nagpur | Sep 30, 2026 30 सप्टेंबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या हद्दपार इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. नागपूरमधील एमआयडीसी परिसरातील भिममनगर येथे ही कारवाई करण्यात आली. विकास उर्फ विक्की मोहनजी राहांगडाले असे अटक केलेल्या हद्दपार आरोपीचे नाव आहे.नागपूर शहर व ग्रामीण भागातून २ वर्षांसाठी हद्दपार असतानाही आरोपी कोणतीही परवानगी न घेता आणि मनाई आदेशाचे उल्लंघन करून एमआयडीसी परिसरात सापडल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.