रामटेक: रामायण हिंदी चित्रपटातील राम, सीता व लक्ष्मणाचे 11 ऑक्टोबरला रामटेक नगरीत आगमन
Ramtek, Nagpur | Oct 5, 2026 नुकताच निर्माणस्थ बिग बजेट हिंदी चित्रपट 'रामायण' यात रामाची प्रमुख भूमिका वठविणारे रणबिर कपूर, सीता साई पल्लवी व लक्ष्मण यांचे रामटेक नगरीत आगामी 11 ऑक्टोंबर ला सायंकाळी 4:00 वाजता आगमन होत असल्याची माहिती राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी दिली. नेहरू मैदान रामटेक येथे सायंकाळी त्यांचा एक कार्यक्रम ठेवण्यात आला असून यात ते रामायण या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित करणार आहेत.