रामटेक: कांद्री वस्ती पेट्रोल पंप जवळ दोन दुचाकीच्या धडकेत एक बाईक स्वार युवक ठार
Ramtek, Nagpur | Sep 10, 2026 गुरुवार दिनांक 10 सप्टेंबरच्या दुपारी दोन ते सव्वादोन वाजताच्या सुमारास नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस स्टेशन रामटेक हद्दीत येणाऱ्या कांद्री वस्ती पेट्रोल पंप परिसरात एका मागून एक चाललेल्या दोन दुचाकीत निसटती कट लागल्याने खाली पडून एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव आकाश रतिराम भरडे वय 26 वर्ष राहणार देवरी बोरडा असे आहे. तर जखमी युवकाचे नाव विशाल भलावी व अरविंद नायक असे आहे.