खुलताबाद: वेरुळ येथे विद्युत वाहिनीचा धक्का ठरला महागात; ट्रकमधील कुटिया साहित्य जळून खाक
खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमातून कुटियाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. ट्रक क्रमांक एमएच-१३ सीयू-५३८४ मध्ये भरलेले साहित्य नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पंचमुखी बालाजी मंदिर येथे २० तारखेपासून सुरू होणाऱ्या यज्ञासाठी नेण्यात येत होते.