सावनेर: 22 सप्टेंबर च्या शासन निर्णयाची होळी, रोजगार सहाय्यकाचे दोन आक्टोंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन
Savner, Nagpur | Sep 25, 2026 ग्राम रोजगार सहाय्यकांच्या सेवा व मानधना संदर्भात 22 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाचा सावनेर तालुक्यातील रोजगार सहायकांनी निषेध करीत शासन निर्णयाची होळी केली सदर निर्णय रद्द करून 3 ऑक्टोबर चा शासन निर्णय पूर्ववत लागू करावा तसेच सेवा व मानधनाबाबत जाचकच रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली याबाबत गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले