Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh
Cbse
Lucknow

महाड: महाडचा राजकीय राडा. "पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा सरपंच ओझर्डेचा आरोप हद्दपार कारण्याची केली मागणी

Mahad, Raigad | Dec 15, 2025
महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप शिरगावचे सरपंच तथा शिवसेना उबाठा उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी केला आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शिवसेनेचे युवानेते विकास गोगावले व इतर आरोपींना अद्याप अटक न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या,मात्र अपेक्षाभंग झाल्याचे त्यांनी नमूद केले.