करमाळा: उजनी जलाशयाजवळ २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला, पोलिस तपास सुरू
करमाळा तालुक्यातील बिटरगाव येथे उजनी जलाशयाजवळ २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. गळ्याभोवती ओढणी आवळल्यामुळे खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह निळ्या जीन्स आणि लाल टॉपमध्ये होता. तपास करमाळा पोलिसांकडून सुरू आहे.