करमाळा: यात्रेवर आलेल्या बहिणीसह तिघांचा मृत्यू; वीट रस्त्यावर अपघात
करमाळा-वीट रस्त्यावर शनिवारी दुपारी ५ च्या सुमारास झालेल्या दुचाकी-कार अपघातात अंजनडोह येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. अंजनडोह येथील यात्रेसाठी स्वाती या माहेरी आल्या होत्या. त्या तिघांवरही काळाने घाला घातला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. मृतांमध्ये हनुमंत केरु फलफले (३५), कांचन केरु फलफले (३०) व स्वाती शरद काशीद (२५) यांचा समावेश आहे. जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.