करमाळा: शेतात काम करताना विजेचा कहर, वाघाचीवाडीतील महिलेला जीव गमवावा लागला
वाघाचीवाडी ता.करमाळा येथे रानात काम करताना अंगावर वीज पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदरची घटना ही 13 सप्टेंबर रोजी घडली आहे. शांताबाई बाळू वाघ असं मृत महिलेचे नाव आहे. करमाळा तहसीलदार यांनी तातडीने सरकार दरबारी शेतकऱ्यांची बाजू मांडून कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक मदत मिळून द्यावी अशी मागणी कुटुंबीयांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे.