करमाळा: शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला; करमाळा पोलिसात तक्रार दाखल
महेश चिवटे यांच्यावर ४ रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास त्यांच्या शेतातून परत येताना एका तरुणाने कॅनलवर बेदम मारहाण केली. त्या तरुणाच्या हातात पांढऱ्या रंगाचा पीव्हीसी पाईप होता. त्याने चिवटे यांना तोंडावर व नाकावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. रश्मी बागची आणि विजय बागची माफी माग,अशी धमकीही दिल्याचे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मारहाणीदरम्यान कोणीही मदतीला न आल्याने हल्लेखोर पळून गेला. याप्रकरणी चिवटे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करमाळा पोलीस करत आहेत.