हिंसेपासून नवजीवनाकडे… सर्वंकष पुनर्वसनातून स्वावलंबनाची नवी वाट!
गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने व स्वावलंबीपणे जीवन जगता यावे, यासाठी दि. 01 सप्टेंबर 2026 रोजी विविध पुनर्वसन लाभांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात 14 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना भूखंडांचे वाटप करण्यात आले. तसेच पुनर्वसन निधीचे धनादेश, आत्मसमर्पित सदस्यांच्या मुलांना सायकली व शैक्षणिक साहित्य, तर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सदस्यांना चारचाकी वाहन चालविण्याचे परवाने मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
नवी संधी • नवा आत्मविश्वास • नवे भविष्य
पुनर्वसनातून सन्मानाच्या नवजीवनाकडे!
#GadchiroliPolice #ProjectSanjivani #Rehabilitation #NewBeginning #SelfReliance PeaceAndProgress CommunityPolicing MaharashtraPolice Gadchiroli
1.1k views | Gadchiroli, Maharashtra | Sep 3, 2026