आरोग्यसेवा थेट नागरिकांपर्यंत… येलचिल येथे 261 नागरिकांची मोफत तपासणी!
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि. 08 सप्टेंबर 2026 रोजी मौजा येलचिल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने 261 नागरिकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधे दिली, तर 17 नागरिकांना पुढील उपचारासाठी रुग्णालयांकडे शिफारस करण्यात आली.
यावेळी फिरत्या प्रदर्शनीद्वारे शहीद जवानांचे बलिदान, C-60 जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या विविध जनकल्याणकारी उपक्रमांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.
आरोग्याची काळजी… विश्वासाची साथ!
गडचिरोली पोलीस — सदैव आपल्या सोबत.
#GadchiroliPolice #HealthCamp #Yelchil #PoliceForPeople #CommunityPolicing MaharashtraPolice
@dgpmaharashtra @mramesh_ips @cmomaharashtra_
29 views | Gadchiroli, Maharashtra | Sep 9, 2026