हिंसेपासून नवजीवनाकडे… आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वंकष पुनर्वसनासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल!
गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने व स्वावलंबीपणे जीवन जगता यावे, यासाठी दि. 01 सप्टेंबर 2026 रोजी विविध पुनर्वसन लाभांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात 14 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना भूखंडांचे वाटप करण्यात आले. तसेच पुनर्वसन निधीचे धनादेश, आत्मसमर्पित सदस्यांच्या मुलांना सायकली व शैक्षणिक साहित्य, तर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सदस्यांना चारचाकी वाहन चालविण्याचे परवाने मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
जिल्हा प्रशासन व गडचिरोली पोलीस दलाच्या समन्वयातून आत्मसमर्पित सदस्यांसाठी आतापर्यंत 174 भूखंड मंजूर करण्यात आले असून त्यापैकी यापूर्वी 153 भूखंडांचे वाटप करण्यात आले त्यासोबतच आज 14 भूखंडाचे वाटप करण्यात आले.
आजपर्यंत एकूण 819 माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण करून शांतता व विकासाचा मार्ग स्वीकारला आहे.
जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी शासनाच्या पुनर्वसन योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले, तर पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता, विकास आणि प्रगतीची वाट निवडणाऱ्या आत्मसमर्पित सदस्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हिंसेपासून शांततेकडे…
पुनर्वसनातून स्वावलंबनाकडे…
नवजीवनातून उज्ज्वल भविष्याकडे!
#GadchiroliPolice #ProjectSanjivani #Rehabilitation #NewBeginning #PeaceAndProgress SelfReliance CommunityPolicing
@mramesh_ips @dgpmaharashtra
93 views | Gadchiroli, Maharashtra | Sep 4, 2026